लष्करी विमान कोसळल्यामुळे द्राक्ष बागेचे सुमारे 25 लाखांचे नुकसान
नाशिक, दि. 28, जून - वावी, शिरवाडे वणी येथे आज सकाळी सुखोई विमान अपघातग्रस्त झाले. लढाऊ विमान शिरवाडे वणी शिवारातील सुखदेव निफाडे यांच्या द्राक्षबागेवर कोसळल्यामुळे द्राक्षबागेचे 25 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
निफाडे यांचे गट नंबर 282 मधील नवीन दीड एकर द्राक्षबाग व व योगेश ढोमसे यांचे गट नंबर 284 मधील एक एकर द्राक्षबाग विमान अपघातग्रस्त झाल्यानंतर आगीत बेचिराख झाले.
सुखदेव निफाडे यांचा मुलगा शाम व एक मजुर त्या द्राक्षबागेत काम करत असतांना विमानाचा काही भाग शाम याच्या अंगावर पडल्याने त्यास दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ पिंपळगाव बसवंतच्या राधाकृष्ण हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.