विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करा : आ. थोरात
संगमनेर प्रतिनिधी
समाजाच्या विकासात शिक्षणाचे मोठे महत्व आहे. ग्रामीण भागासह सर्वत्र उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देतांना शिक्षकांनी आणि पदाधिकार्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी ( दि. १५ जून ) विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करावे, असे आवाहन माजी महसूल आणि शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत उद्योग समुहाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी समवेत आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, अजय फटांगरे, सभापती निशा कोकणे, नवनाथ अरगडे, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मणराव कुटे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, प्रा. बाबा खरात, केशवराव मुर्तडक, अॅड. मधुकरराव गुंजाळ, सिताराम राऊत, राजेंद्र कडलग, साहेबराव गडाख, जगन आव्हाड, डॉ. राजेंद्र मालपाणी आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, ग्रामीण भागात मोठी गुणवत्ता आहे. तिला योग्य संधी देण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्या लागतील. खेडोपाडी असलेल्या जि. प. शाळांमधून शिक्षकांनी अधिकाधिक गुणवत्ता जपत ज्ञानदान करावे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन करावे. इंग्रजीची भिती काढून टाकत विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीविषयी गोडी निर्माण करावी. हसत खेळत शिक्षणानेच उद्याचे समृद्ध नागरिक घडतील.