अपघाती विमा योजनेचा २१ जूनला प्रारंभ : परजणे
कोपरगाव शहर प्रतिनिधी :
येथील नामदेवराव परजणे दूध उत्पादक शेतकरी अपघाती विमा योजनेचा शुभारंभ दि. २१ जून रोजी करण्यात येणार आहे. स्व. नामदेवराव परजणे यांच्या जयंतीचे औचित्य साधून या योजनेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती राजेश परजणे यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, या योजनेचा लाभ एकूण ३० ते ३५ हजार दूध उत्पादक शेतकऱयांना आणि २ हजार ५०० दूध विक्रेत्यांना मिळणार आहे. विमाधारकाचे अपघाती निधन झाल्यास त्याच्या वारसांना २० लाख रुपये मिळणार आहेत. दरवर्षी सुमारे १ कोटी ८० लाख रुपये इतकी रक्कम टप्याटप्याने दूध संघ भरणार आहे. तसेच संघाच्या कार्यक्षत्रातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या आजाराचे निदान होण्यासाठी या भागात प्रयोगशाळा नाही . त्यासाठी शेतकऱ्यांच्या जनावरांना माफक दरात पशुरोग निदान प्रयोगशाळा व औषध सेवा देण्याच्या उद्देशाने गोदावरी खोरे संघ व बायफ अँग्रो अँड बायोटेकनॉलॉजी प्रा. लि. यांचे संयुक्त विद्यमाने निदान व प्रयोगशाळा व मेडिकल स्टोअरची सुरुवात होणार आहे.