नाट्य संमेलनाच्या पूर्वरंगाचे आज शानदार उद्घाटन
मुंबई, दि. 10, जून - अखिल भारतीय ना्टय परिषद आयोजित 98 वे अखिल भारतीय नाट्य संमेलन-2018 चा प्रारंभ 13 जून पासून मुलुंड येथे होत आहे. यानिमित्ताने आज भांडूप येथील शिवाजी तलाव येथे आयोजित नाट्य संमेलनाचे पूर्वरंग या कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री व अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमास अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, नाट्य संमेलन अध्यक्ष किर्ती शिलेदार, सुप्रसिध्द अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री मधुरा वेलणकर, अनंत पणशीकर, खासदार किरीट सोमय्या आदी मान्यवर उपस्थित होते.
यानिमित्ताने भांडूप कला कट्टाचे उद्घाटन तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. पूर्वरंग कार्यक्रमास तावडे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पूर्वरंग कार्यक्रमामध्ये नाट्यसंगीत, पथनाट्य, एकांकि का, संगीत जुगलबंदी आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वरंगच्या निमित्ताने ढोलताशाचे आयोजन करण्यात आले होते. ढोलताशाच्या गजरात पूर्वरंग कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी नाट्य क्षेत्रातले विविध मान्यवर व रसिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती.