Breaking News

मृगाने मुहूर्त साधला!


सात्रळ प्रतिनिधी  - सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेशव करताच पंचक्रोशीत पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सात्रळ, सोनगावसह पंचक्रोशीत शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह संथपणे पाऊस बरसला. पावसामुळे सर्वत्र पाणी साचले. यामुळे दुकानदारांची धावपळ उडाली तर चिमुकल्यांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.