Breaking News

प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यास “एंकोरे हेल्थकेर प्रायव्हेट लिमिटेड”कंपनीत नोकरी

प्रवरानगर २ जून २०१८
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्र महाविद्यालयातील आकाश पवार आणि गौरव चिंचोरे या विद्यार्थ्यांचे एंकोरे हेल्थकेर प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.

पदवी अभ्यास क्रमातील विद्यार्थ्यांच्य ३१ मे २०१८ रोजी झालेल्या इंटरव्हिवद्वारें “एंकोरे हेल्थकेर प्रायव्हेट लिमिटेड”कंपनीच्या प्रोडक्टशन आणि क्वालिटी अशुरन्सया विभागात निवड झाली आहे. अंतिम वर्षाचा परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी आत्तापर्यंत 60 पैकी २९ विद्यार्थ्यांना नोकरी मिळालीआहे.
तसेच या विद्यार्थ्यास प्लेसमेंट विभागाचे प्रमुख एम. एच. कोल्हे व त्यांचे सहकारी टी. पी. डुक्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परीषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , सहसचिव श्री. भारत घोगरे,शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, डॉ.अशोक कोल्हे,, डॉ. हरिभाऊ आहेर तसेच शिक्षकांनी अभिनंदन केले.