Breaking News

सेवेन्थ डे इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल


नेवासाफाटा प्रतिनिधी

नेवासा येथील एस.टी. स्टँड जवळ असलेल्या सेवेन्थ डे इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला, अशी माहिती प्राचार्य रावसाहेब बत्तीसे यांनी दिली. 

या परीक्षेत विद्यालयातील हर्षदा शेटे ९२ टक्के (प्रथम), ओंकार माळवे ८७ टक्के (व्दितीय), विश्वजित जाधव ८४.४० टक्के (तृतीय) यांनी विशेष यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य रावसाहेब बत्तीसे व सर्व विषयांच्या शिक्षकांसह पालकांनी अभिनंदन केले असून यशामध्ये मोठे योगदान देणाऱ्या शिक्षकांना पालकांनी धन्यवाद दिले आहेत.