Breaking News

सेंट मेरी इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकाल

नेवासाफाटा प्रतिनिधी : नेवासा येथील फाटा परिसरात असलेल्या सेंट मेरीज इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेने सलग १५ व्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असल्याचे प्राचार्या सिस्टर ज्योत्स्ना यांनी सांगितले.

या विद्यालयात अभिषेक लाजरस गायकवाड याने ९९. ६० टक्के गुण मिळविले. ९९ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. यामध्ये ८० विद्यार्थी विशेष प्राविण्य तर अठरा विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. यावर्षी अभिषेक गायकवाड ९९. ६० टक्के (प्रथम), प्राची प्रदीप मोरले, ९६ टक्के (द्वितीय), तन्मय दिलीप जगदाळे ९५. २० टक्के ( तृतीय)यांनी विशेष यश संपादन केले. शिवम शिंदे व सृष्टी भदगले या दोन विद्यार्थ्यांनी गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून बाजी मारली. अठरा विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य सिस्टर ज्योत्स्ना व व्यवस्थापक सिस्टर साली व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.