सीआरपीएफ वाहनावर दहशतवादी हल्ला
केंद्रीय रिझर्व पोलीस दलाच्या 183 बटालियनच्या बंकर वाहनावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. पुलवामातील इदगाह येथे जात असलेल्या या वाहनाला दहशतवाद्यांनी आपले लक्ष्य बनवले. हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसून सीआरपीएफ जवानांनी परिसराला वेढा घातला आहे. दरम्यान आत्मघाती दहशतवाद्यांनी जंग-ए-बदरनिमित्त हा हल्ला केला असल्याची शक्यता आहे. फिदायती दहशतवाद्यांतर्फे 1 ते 3 जूनदरम्यान अशा प्रकारचे होण्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली होती.