पावसाळी अधिवेशन नागपूरमध्येच होणार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडून आदेश जारी
मुंबई : येत्या 4 जुलैपासुन सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरलाच होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यासंदर्भातील आदेश आज जारी केले आहेत. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांनी आगामी पावसाळी अधिवेशन हे येत्या 4 जुलै पासुन सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र हे अधिवेशन मुंबई किंवा नागपूरला होणार असल्याचे स्पष्ट केले नव्हेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी आग्रही होते. मुंबईतील मनोरा आमदार निवास सध्या दुरूस्तीसाठी काढण्यात आल्याने आमदारांच्या निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच धर्तीवर पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आगामी पावसाळी अधिवेशन येत्या 4 जुलै पासुन नागपूर येथे घेण्याचे आदेश जारी केले आहेत.