Breaking News

सोपोरमध्ये 2 दहशतवादी अटकेत

श्रीनगर, दि. 30 -  जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे गुरुवारी सकाळी सुरक्षा रक्षकांना दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 52 राष्ट्रीय रायफल्स आणि विशेष पथकाच्या जवानांनी संयुक्तरित्या मोहिम राबवत हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. सोपोरमधील अमरगड भागात हे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शौकत अहमद भट आणि तन्वीर अहमद दार अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.