Breaking News

खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा 'आप'च्या रॅलीत सहभागी होणार



वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 'अघोषित आणीबाणी' लागू केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने (आप) केला आहे. आपने मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत एका सभेचे आयोजन सोमवारी केले होते. या सभेपासून आपचे व्यापक आंदोलन सुरू होणार आहे. या रॅलीमध्ये भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा सहभागी झाले. आपचे जिल्हाध्यक्ष मुकेश सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या युनिटअंतर्गत येथील बेनिया बाग येथील राजनारायण पार्क येथे 'विशाल जनाधिकार रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे.