Breaking News

नूकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यासाठी सतर्कतेचे आदेश उपसभापती मारुती मेंगाळ यांची माहिती

अकोले तालुक्यात गेली तीन-चार दिवसांपासुन वादळी वार्‍यात यात शेतकर्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने अनेक ठिकाणी शेतीमाल वादळी वार्‍यात घरांवरचे छत, पत्रे उडाल्याने या सर्व नूकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना सतर्क राहुण पंचनामे करण्यासाठी सुचना दिल्या असल्याची माहिती उपसभापती मारुती मेंगाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पावसाळा सुरु होताच, जून महिण्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवातीलात शेतकर्‍यांना वादळी वार्‍याच्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आल्याने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी नूकसानग्रस्त भागांची पाहणी करुन, पंचनामे करण्यासाठी तहसील प्रशासनाने सर्व तलाठी कर्मचार्‍यांना सूचना दिल्याने, अकोले पंचायत समितीने देखिल पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तसेच ग्रामसेवकांना सतर्क राहुन पंचनामे करण्यासाठी सुचना दिल्याने नूकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी प्रशासकिय यंत्रना सज्ज करण्यात आल्याने, तालुक्यातील नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेली तीन-चार दिवसांमध्ये वादळी वार्‍यात प्रवरा, मुळा, आढळा या विभागांमध्ये चवळी, मका, दाळींब, टॉमेटो यासहित उभे पिक मातीमोल झाले. तर दुसरीकडे घरांवरचे, पत्रे, छत तर अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये मोठ-मोठी झाडे कोसळली. तर, बहुतांशी ठिकाणी विद्युत वितरक तारांचे पोल पडल्याने तालुक्यातील अनेक गावांना अंधारात दोन-तीन दिवस राहण्याची वेळ आल्याने, या सर्व नूकसान झालेल्या भागांची पाहणी बहुतांशी ठिकाणी झाली असुन, पर्यायी उपाययोजना सुरु असुन, नूकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी, शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन सज्ज असुन, गुरुवारी या सर्व नूकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्याकरिता तालुक्यातील ग्रामसेवकांची पंचायत समिती येथे बैठक आयोजित केली असुन, कुठल्याही प्रकारची अडचन भासल्यास शेतकर्‍यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहण देखिल उपसभापती मारुती मेंगाळ यांनी केले आहे.