Breaking News

सुपा येथे होणार 4 मॅगावॅटचा सौर प्लँन्ट

पारनेर तालुक्यातील सुपा येथील गायरान क्षेत्रातील जागेवर 4 मेगावॅटच्या सौर प्लँन्टसाठी सुपा ग्रामपंचायतने ना हारकत दिली असून, त्यासाठी लागणारे मागणी पत्र, सर्वे, इस्टीमेंट आदी पूर्ण झाले असून, हा प्रकल्प उभा राहावा यासाठी पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार यांनी पाठपुरावा केला.
ऊर्जामंत्री बावनकुळे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी आले असता, त्यांची उपसभापती दीपक पवार यांनी भेट घेवून त्यांना प्रस्ताव देवून, त्यांनी तातडीने राळेगण सिद्धीला वाढीव 3 मॅगावॅट व सुपा येथे 4 मॅगावॅटला मंजूरी दिली आहे.

सुपा गावासाठी नेहमी कमी दाबाने विद्युत पुरवठा होत होता, याचा परिणाम शेतातील मालावर होत असल्याने पुर्ण दाबाने विद्युत पुरवठा व्हावा अशी शेतकर्‍यांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. मात्र या प्लँन्टमुळे गावातील शेतीसाठी लागणारा विद्युत पुरवठा दिवसा 12 तास पूर्ण दाबाने मिळणार आहे. यासाठी शासनाच्या वतीने या प्लँन्टसाठी 24 कोटी रुपये खर्च होणार आहे. यासाठी सुपा गावचे सरपंच भाऊ पवार, उपसरपंच राजू शेख, ग्रामपंचायत सदस्य आदींनी सहकार्य केले.