Breaking News

सीआरपीएफच्या वाहनावर जमावाची दगडफेक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बनिहालमध्ये जमावाने सीआरपीएफच्या वाहनाला लक्ष्य केले. गुरुवारी दुपारी दगडफेकीची घटना घडली असून घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दगडफेकीच्या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सीआरपीएफच्या वाहनाची एका गाडीला धडक बसल्याच्या कारणातून दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. यावेळी गाडीतील जवानांनी दगडफेकीपासून बचावाचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील वातावरण धुमसत आहे.