सहायक पोलीस निरीक्षक डॉ. गोर्डे यांचा गौरव
नेवासा फाटा प्रतिनिधी : नेवासा पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांचा पारधी समाजाच्यावतीने गौरव करण्यात आला. पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा पोलीस प्रशासनाचा मुख्य प्रयत्न आहे. त्यासंदर्भात नेवासा तालुक्यात सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सपोनि गोर्डे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी पारधी समाज संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख मंगल कल्याण चव्हाण यांनी सपोनि डॉ. गोर्डे यांचा सत्कार केला. पारधी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मेळावा घेऊन आम्हाला व आमच्या उच्च शिक्षण घेत असलेल्या मुलांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती यावेळी चव्हाण यांनी केली.
