प्रा. शिंदे आणि प्रा. दहे सेट उत्तीर्ण
कोपरगाव ता. प्रतिनिधी - रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या ज्युनिअर विभागातील शिक्षिका श्रीमती छाया शिंदे आणि सिनिअर विभागाचे सी. एच. बी. प्रा. रावसाहेब दहे हे सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे द्वारा आयोजित दि. २८ जानेवारीमध्ये झालेल्या या दोघांना सदर परीक्षेसाठी मराठी विषयाच्या विभागप्रमुख डॉ. शीला गाढे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजीमंत्री शंकरराव कोल्हे, अशोक काळे, बिपीन कोल्हे, आशुतोष काळे आदींनी अभिनंदन केले.
