मृत जनावरांमुळे मनस्ताप
सोनई : कांगोणी रस्त्यालगतचे अनेक शेतकरी मृत गायीसह त्यांचे बछडे रस्त्याच्या कडेला टाकतात. यामुळे दुर्गंधी पसरत असून दुचाकीसह पादचारी व्यक्तींना यामुळे मोठा मनस्ताप होत आहे. आयुष्यभर ज्या गायीचे दूध प्राशन करायचे आणि गायी मृत झाल्यानंतर त्यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकायचे, हा आडमुठेपणा या भागांत सुरु आहे. त्यामुळे या जनावरांचे मृतदेह शेतात खड्ड्यात पुरावे, अशी मागणी होत आहे.