Breaking News

निंबाळकर याने पटकाविला २८९ वा क्रमांक


राहाता प्रतिनिधी : देशातील २३ इंडियन इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजिमधील (आयआयटी) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या जेईई अॅडव्हॉन्स घेण्यात आलेल्या परिक्षेत कोपरगांव येथील गणेश कोचिंग क्लासेस आनंद भाऊसाहेब निंबाळकर हा देशात २८९ क्रमांकाने उत्तीर्ण झाला. याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. 

या परिक्षेत देशभरातील १ लाख ५५ हजार १५८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी या परिक्षेत पात्र ठरले. या परिक्षेत हरियानाचा प्रविण गोयल याने ३६० पैकी ३३७ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर आनंद निंबाळकर याने २४८ गुण मिळवून देशात २८९ वा क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाला. गणेश शैक्षणिक संस्थेचे प्रमुख प्रा. विजय शेटे यांनी आनंद व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. आनंदचे वडिल हे सैन्यदलात तर आई शिक्षिका आहे.