विखेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा
लोणी : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा परिवाराच्यावतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात सकाळी १० वा. हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यास राज्यासह जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राहता तालुक्याच्यावतीने दुपारी ४ वा. राहाता येथे सिध्द संकल्प मंगल कार्यालयात विखेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.