Breaking News

जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेत सोलापूर आघाडीवर

सोलापूर, दि. 23, जून - जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेमध्ये राज्यात सोलापूर जिल्हा आघाडीवर असल्याबाबत दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. उत्तर सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये झाडाचे रोप भेट दिले जाते, यावर सदस्यांनी समाधान व्यक्त केले. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेमध्ये राज्यात जिल्हा आघाडीवर आहे. माळशिरस व बार्शी तालुक्यातील पायलट प्रोजेक्ट कामाचा आढावा बैठकीत घेतला. या तालुक्यामध्ये होणार्‍या एकूण प्रसूतीपैकी सिझेरियनचे प्रमाण 30 टक्के पेक्षा जास्त आहे. पण, शासकीय दवाखान्यात 15 टक्केपेक्षा कमी आहे, असे सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी आरोग्य विभागाच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच, प्रश्‍नांना उत्तरे दिली.