Breaking News

संजीवनी इंग्लिश मिडीयमचा शंभर टक्के निकाल



कोपरगाव शहर प्रतिनिधी : तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलचा इयत्ता दहावीचा निकाल सालाबादप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के लागला. या परिक्षेत ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयमना शेख ही ९१. ८० टक्के मिळवून प्रथम आली.

यामध्ये प्रतिक शिंदे हा ८९. ८० टक्के मिळवून द्वितीय तर सौरभ गवळी हा ८८. ८० टक्के गुण मिळवून तृतीय गुणानुक्रमांने उत्तीर्ण झाला. माजीमंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, आ. स्नेहलता कोल्हे, कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, प्राचार्य बाळासाहेब जाधव आदींनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.