छत्रपती शिवाजी आणि राधाबाई काळे विद्यालयाचे सुयश
कोपरगाव ता. प्रतिनिधी : तालुक्यातील कोळपेवाडी येथील श्री. छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय व राधाबाई काळे कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी याहीवर्षी एस. एस. सी. बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल ८२. ५७ टक्के एवढा लागला असून राधाबाई काळे कन्या विद्या मंदिराचा शेकडा निकाल ८४. ८५ टक्के एवढा लागला, अशी माहिती श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य काळे एस. एच. आणि राधाबाई काळे कन्या विद्या मंदिराचे प्रभारी प्राचार्य गायकवाड एस. जे. यांनी दिली.
श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रथम आलेले तीन मानांकित पुढीलप्रमाणे – प्रथम दळवी यश जयप्रकाश ९३.४ टक्के, द्वितीय- पानगव्हाने प्रसाद संजय ९२.६० टक्के, तृतीय – चोथे समीर आरून ९२.२० टक्के, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरातील प्रथम तीन मानांकित विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे – प्रथम गावित्रे पल्लवी रमेश ९४.८ टक्के, द्वितीय- मेहेरखांब निकिता रमेश ९३.०० टक्के, तृतीय – कदम गौरी कैलास ९२. ८० टक्के या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कोपरगाव तालुक्यातील सर्वच विद्यालयातील एस. एस. सी. परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे माजी आ. अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, प्राचार्य काळे एस. एच., राधाबाई काळे कन्या विद्या मंदिराचे प्रभारी प्राचार्य गायकवाड एस. जे. यांनी अभिनंदन केले आहे.
