डेब्रीज चौकशीचा अहवाल सादर झाल्याशिवाय सुर्यवंशींना कार्यमुक्ती नाही
सौनिक पर्वात प्रकरण पुन्हा तापले नाशिक अधिक्षक अभियंता कार्यालयात बसला हादरा
मुंबई/विशेष प्रतिनिधी । 19 :
सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव म्हणून मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालय डेब्रीज घोटाळा चौकशीच्या प्रक्रीयेने पुन्हा वेग घेतला असून चौकशी अधिकारी मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी चौकशी अहवाल सादर केल्याशिवाय त्यांना बदलीवर कार्यमुक्त न करण्याचे आदेश मंत्रालय पातळीवरून निर्गमित झाले आहेत.प्रधान सचिव पदाचा खांदेपालट झाल्यामुळे मधल्या काळात डेब्रीज घोटाळ्याची चौकशी रोडावली होती. या घोटाळ्यातील मुख्य संशयीत सुत्रधार शहर इलाखा साबां विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांनी काही काळासाठी सुटकेचा निःश्वास टाकला होता. तथापी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील व मनोज सौनिक यांनी पुन्हा चौकशीला वेग देण्याचे संकेत दिल्याने नाशिक साबांच्या अधिक्षक अभियंता कार्यालयात हादरे बसू लागले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना सार्वजनिक बांधकाम विभागात आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखविण्याची सार्वजनिक बांधकाम खात्यातील उघड झालेल्या घोटाळ्यांनी दिली नाही. विशेषतः शहर इलाखा साबां विभागाच्या माध्यमातून मंत्रालय परिसरात झालेल्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार शोधून सत्य खोदण्यात वेळ आणि शक्ती खर्च झाली. त्यातच मंत्रालय परिसरातील डेब्रीज घोटाळ्याने पारदर्शकतेला आव्हान दिल्याने या घोटाळ्याशी संबंधित कार्यकारी अ भियंता आणि त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांचा शोध घेण्याचे आव्हान शासन प्रशासनासमोर उभे ठाकले होते. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना तक्रारीसोबत दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावरून मुख्य संशयितांपर्यंत पोहचणे शक्य झाले.शहर इलाखा विभागाचे तत्क ालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि त्यांच्या मर्जीतील गोतावळ्यातील कंत्राटदारांकडे घोटाळ्याची सुई रोखली जात होती. या घोटाळ्याच्या आरोपातून चौक शीविना बाहेर पडण्यासाठी संबंधितांनी केलेले प्रयत्न फोल ठरून मुख्यमंत्री आणि साबां मंत्र्यांच्या आदेशावरून प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी मुंबई साबांचे अ धिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांच्याकडे डेब्रीज घोटाळ्याच्या चौकशीची सुत्रे सोपविली.
संबधितांनी दबावतंत्राचा वापर करून सुर्यवंशी यांना अहवालात फेरफार करण्यासाठी राजी करण्याचे प्रयत्न झाले. तोंड दाबून बुक्यांचा मार सोसण्यापेक्षा बदलीवर जाण्याचा निर्णय सुर्यवंशी यांनी घेतला. बदली झाली.दरम्यानच्या काळात प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांचे ट्रेनींग आणि ट्रेनींग काळातच बदली यामुळे चौकशीला खोडा बसला.
तथापी आशिषकुमार सिंह यांच्या जागेवर भारतीय प्रशासनात कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेले मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारला. सौनिक यांनी बांधकामचा पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी प्रथमच डेब्रीज घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडली. आणि बदली झालेले अरविंद सुर्यवंशी यांनी या चौकशीचा अहवाल सादर केल्याशिवाय त्यांना कार्यमुक्त करू नयेत, असे आदेश झाले. साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील, साबांचे प्रधान सचिव मनोज सौनिक आणि तक्रारदार आ. चरणभाऊ वाघमारे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे आदेश जारी झाल्याने डेब्रीज घोटाळ्याची चौकशी पुन्हा वेग घेणार असल्याचा संकेत मिळाल्याने रणजीत हांडे यांच्या विरूध्द कारवाईचे फास आवळले जातील आणि आ. चरणभाऊ वाघमारे यांचा पाठपुरावा कारणी लागेल असा विश्वास साबांत व्यक्त होतो आहे.
सोमवारपासून विशेष वृत्तांत ...
मार्च अखेर काढलेल्या देयकांचे गौडबंगाल
शशीकांत घाटगे, अशोक काशीनाथ बागूल, हेमंत सावंत आणि शाखा अभियंता तथा विजय पाटील यांनी मार्च अखेर काढलेल्या देयकांचे गौडबंगाल काय आहे?
हेमंत सावंत 2 कोटी
विजय पाटील 8 कोटी
शशीकांत घाटगे 16 कोटी
अशोक बागुल 7 कोटी
काय आहे या आकडेवारीचे रहस्य