प्राची देवमाने आणि अनुराधा पागिरे यांचे सुयश
जामखेड तालुक्यातील जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात शिकणार्या देवमाने प्राची गणेश व पागिरे अनुराधा रामदास या दोन विध्यार्थीनींची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत 8 वी ते 12 वीपर्यंत दरवर्षी बारा हजार रुपये देण्यात येणार्या, शिष्यवृत्तीसाठी या दोघींची निवड झाली. या निवडीनंतर त्यांचे जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, जि.प. सदस्य सोमनाथ पचारणे, सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील, जवळा गावाचे सरपंच अनिल पवार, उपसरपंच गौतम कोल्हे, प्रशांत शिंदे, उमेश रोडे, शरद हजारे, प्रदीप दळवी, सा. कार्यकर्ते राजेंद्र राऊत, अभय नाळे, जवळा विकास समुहाचे सावता हजारे, अशोक पठाडे, संदेश हजारे, किरण हजारे, मुकुंद रोडे, प्रफुल्ल कोकाटे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.गरीब विद्यार्थ्यांचं बारावीपर्यंतचं शिक्षण सुलभरीत्या होण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. त्याद्वारे दरवर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात असून या परीक्षेत चांगले गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदा आमच्या शाळेच्या दोन विद्यार्थिनींची यात निवड झाल्याने, निश्चितच याचा आनंद असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापकांनी सांगितले.अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीद्वारे देण्यात येणारी रक्कम ही केवळ 6 हजार रुपये असत, मात्र या वर्षापासून ही रक्कम दुप्पट म्हणजेच 12 हजार रूपये इतकी करण्यात आली आहे.