सोशल मीडियावरील अपशब्दांनी तरूण अडचणीत तरूणांवर सायबर सेलची प्रतिबंधात्मक कारवाई
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील तीन महाविद्यालयीन तरूणांनी पारनेरचे आ. विजय औटी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याप्रकरणी नगरच्या सायबर सेलने तीन तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला. या संबंधीची फिर्याद स्वतः आ. विजय औटी यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांचेकडे केली. त्यानुसार तीन तरूणांविरोधात भारतीय दंडविधान कायदा 504, 499, 500/34 सायबर क्राईमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या तीन तरूणांपैकी दोन जणांना पारनेर पोलिसांनी ताब्यात घेवून, त्यांना पोलिस अधिक्षक कार्यालयात सादर करण्यात येवून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.