Breaking News

पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही; मुख्यमंत्र्यांचा पलटवार

मुंबई - शरद पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर ट्विटरवरुन पलटवार केला आहे. पुणे येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना पवारांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना आलेल्या धमक्या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशय व्यक्त केला होता.

रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ही शंका व्यक्त केली होती. यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान हे पक्षाचे नाही, तर देशाचे नेते असतात. शरद पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही. पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत, सत्य बाहेर येईलच, असे ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी!