Breaking News

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी रक्ताटे


कोपरगाव शहर प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संभाजी रक्ताटे यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्यावतीने आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे यांच्या हस्ते रक्ताटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आश्रमाचे अध्यक्ष सूर्यवंशी म्हणाले, ‘शेतक-यांच्या हितासाठी काम करण्याची उर्मी एका शेतकरी जनसेवकाकडे असते. म्हणूनच काही दिवसांपूर्वी कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेतकरी कुटूंबवत्सल असणारे संभाजी रक्ताटे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगांव सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.’ दरम्यान, अध्यात्मिक आवड जोपासणारे रक्ताटे हे गुरूमाउलींचे भक्त आहेत. त्यामुळे सद्गुरू माउलींचे कृपाशिर्वाद व विश्वात्मक जंगली महाराज आश्रमास सदिच्छा भेट घेणेसाठी आले होते. यावेळी आश्रमाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.