Breaking News

समाजसेवक काळे नगरपालिकेत खेळणार गोट्या!


कोपरगाव शहर प्रतिनिधी

शहरातील डॉक्टर संघटनेने कोपरगाव तलाठी कार्यालयासमोरच्या आवारात डॉक्टरदिनानिमित्त वृक्ष लागवड केली होती. त्याच्या शेजारीच दवाखाना असलेल्या डॉक्टरांचे वडिल वृक्षसंवर्धन करण्यात मग्न असताना अचानक कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी काहीही न ऐकता सरळ आर्वाच्च भाषेत एका ज्येष्ठ नागरीकाला अपमानित केले. त्याचा निषेध म्हणून कोपरगाव आयएमए संघटनेचे पदाधिकारी मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी व जाब विचारण्या साठी गेले. मात्र मुख्याधिकारी दरेकर यांनी उद्धट भाषा वापरून डॉक्टरांनाच सुनावले, तुम्ही सामाजिक काम करता मग आम्ही काय गोट्या खेळतो का? मुख्याधिकारी दरेकर यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी समाजसेवक काळे हे येत्या गुरुवारी { दि. ७ } सकाळी ११ ते १२ या वेळेत नगरपालिकेच्या आवारात समाजसेवक गोट्या खळणार आहेत. यासंदर्भात काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली.