Breaking News

‘कर्मवीर भाऊराव पाटील’मध्ये शालेय साहित्य वाटप


आश्वी : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवस आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. 

शाळा समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब भोसले अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी प्राचार्य भास्कर तांबे यांनी प्रास्तविक केले. यावेळी १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट निकालाबद्दल अभिनंदन आणि नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. दिनकर गायकवाड, मकरंद गुणे, बाळासाहेब मांढरे, श्रीमती लुणिया यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी डॉ. बाळासाहेब आंधळे, नानासाहेब तळेकर, ग्रंथपाल उल्हास देव्हारे, पर्यवेक्षक गजानन घोलप, विलास गिते, संपत कुटे, आयुब पठाण, बाळासाहेब घोलप, दादू पाळंदे, रामचंद्र मगर, मुख्याध्यापक नवनाथ घुगे, विष्णु गायकवाड, हौशीऱाम फड आदींसह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन नवनाथ इलग यांनी केले. विश्वनाथ तांबे यांनी आभार मानले.