Breaking News

मालमोटारीच्या धडकेने टोलनाका कोसळला


।संगमनेर/प्रतिनिधी।

तालुक्यातील कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील वडगावपान येथील बंद पडलेल्या टोल नाक्याला रात्री अकराच्या सुमारास मालमोटारीने धडक दिली. त्यामुळे हा टोलनाका पूर्णतः कोसळला. संगमनेर लोणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीकडे सदरचा टोलनाका चालविण्यास होता. काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने सदरचा टोलनाका बंद केल्याने सदर कंपनीने ही टोल वसुली बंद केली आहे. परंतु या रस्त्यावर बांधलेला टोल नाक्याची लोखंडी शेड तेंव्हापासून त्याच अवस्थेत आहे. हा टोलनाका मोडकळीस आला होता. काल रात्री अचानकपणे एका मालमोटारीची (क्र. एम. एच. १७ के. ५०९४) धडक बसल्याने हा टोलनाका कोसळला. सुदैवाने यामध्ये जिवितहानी झाली नाही. 

दरम्यान इतकी वर्षे उलटूनही सदरील टोल व्यवस्थापनाने किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल का घेतली नाही आणि नागरिकांच्या जीवावर बेतणारा हा टोलचा डोलारा तसाच उभा ठेवला, यासाठी नेमके जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहेत.