Breaking News

येवला नगरसुल रोडवरील अपघातात दोघे ठार

येवला - नगरसुल रोडवर कापसे वस्तीच्या पुढे प्रवासी काळी पिवळी टाटा मॅजिक व मोटरसायकल यांच्यात समोरा समोर झालेल्या भिषण अपघातात मोटारसायकल चालक व टाटा मॅजिक चालक जागीच ठार झाले. मंगळवारी दुपारी आठवडे बाजार करून येवल्याहुन नगरसुल कडे जाणारे टाटा मॅजिक वाहन क्रमांक एमएच १५ सीडी ६५१८ व नगरसुल कडुन येवल्याकडे येणारी मोटार सायकल क्रमांक एमएच १७ एल ७१६० यांच्यात समोरा समोर धडक झाली. या अपघातात मोटार सायकल चालक बाळु माळी (वय ३२), रा. वडगाव बल्हे, ता. येवला व टाटा मॅजिक चालक तारिक अहमद मो. हसन (वय २८), रा. मुलतानपुरा, येवला या दोघांना गंभीर मार लागला असल्याने त्यांना तात्काळ येवला येथील ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या तपासणी अंती दोघेही मयत असल्याचे सांगण्यात आले. सदर अपघाता बाबत येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तांदळकर हे तपास करीत आहेत.