सायना नेहवाल पडली प्रेमात?
मुंबई : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू आणि फुलराणी म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल सध्या सोशल मीडियावर म्हणजे इस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या फोटोमुळे जोरदार चर्चेत आहे. सायना ही आपल्या शानदार खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी ती प्रेमात पडल्याच्या गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. साायनाचा इस्टाग्रामवर एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप हे दोघे दिसतात.सायना आणि कश्यपचे एकमेकांसोबतचे फोटो पाहून दोघांच्याही चाहत्यांनी अनेक तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दोघांमध्ये काही तरी निश्चितपणे चालले आहे, अशी त्यांच्यात चर्चा आहे.