Breaking News

जम्मू-कश्मीरमध्ये हायअलर्ट काश्मीरमध्ये 20 दहशतवाद्यांची घुसखोरी

श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये 20 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जम्मू-कश्मीरमध्ये हायअलर्ट लागू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत लष्कराच्या विविध ठिकाणांवर आत्मघाती हल्ला होऊ शकतो. तसेच हा हल्ला ‘हिट ऍण्ड रन’ सारखा केला जाईल, अशी शक्मयता व्यक्त करण्यात आली आहे. रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबवण्यात येत असल्याची घोषणा सरकारनं केल्यानंतर सीमेवर दहशतवादी क ारवायांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी जवानांच्या गस्तीपथकावर हल्ला करणाऱया दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं होतं. दरम्यान घुसखोरी करणारे दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर सावध झाले आहे. सुंजवान आणि पठाणकोट हल्ल्यांपासून धडा घेत यावेळी कोणतीही चूक न करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. गस्ती पथक, चौक्मयांसह लष्कराच्या महत्त्वाच्या ठिक ाणांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.