Breaking News

नाशिकमध्ये एव्हीएशन कंपनीचा कोट्यावधीचा एनपीए

विस्तारीकरणाच्या धोरणात नाशिक शहरात बँकेने शाखा सुरू केली. अनेक लहान मोठी कर्ज प्रकरणे झाली. ती कशी झाली हा संशोधनाचा मुद्दा आहे. यापैकी अनेक कर्जदारांनी बँकेला ठेंगा दाखविल्याने वसूलीचा आनंदी आनंद आहे. प्राप्त माहीतीनुसार नाशिकचे पालकमंत्री आणि चेअरमनच्या राजकीय गोतावळ्यातील संबंधीत एका एव्हिएशन कंपनीला चार्टड प्लेन खरेदी करण्यासाठी कोट्यावधीचे कर्ज दिले होते. ते कर्जखाते एनपीएत असल्याची चर्चा असून सारा व्यवहार संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.