Breaking News

कुरआन शरीफचे एकत्रिकरण ही अद्वितीय घटना

कुरआन शरीफ हा अल्लाहचा ग्रंथ (कलाम) आहे. इस्लामचा मुळ हा कुरआनपाकवर आहे. तो आसमानी फरमान आहे. ज्याने कुरआनमधील आचरण केले. तो इस्लाममध्ये सामील आहे. ज्याने याचा इन्कार केला तो इस्लाममधून खारीज (निष्काषित) आहे. ज्यावेळी प्रेषित पैगंबर 40 वर्ष वयाचे झाले त्यावेळी आपणास प्रेषित्व (नबुनत) प्राप्त झाले. त्याच काळात कुरआनचे आवतरण (नुजूल होना) सुरु झाले. काळानुरुप व परिस्थितीनुरुप कुरआनचे वेळोवेळी अवतरण होत राहिले. त्याच्या एकूण अवतरणाला तेविस वर्षाचा कालावधी लागला. इतर ग्रंथप्रमाणे एकाच वेळी संपूर्ण अवतरण झाले नाही. (कुरआनशरीफच्या पूर्वी प्रेषित हजरत मुसा.अलैसलाम यांच्यावर तौरेत, हजरत ईसा अलैसलाम यांच्यावर जबूर हे आसमाजनी ग्रंथ एकाच वेळी अवतीर्ण झाले व विशेष म्हणजे या धर्मग्रंथाचे अवतरणसुद्धा रमजान महिन्यात झाले होते) 


खरे असे आहे की, प्रेषित पैगंबरांना नबुवत प्राप्तीनंतर रमजान महिन्याची पवित्र रात्र शबेकदरमध्ये पूर्ण कुरआनमजीद लुहेमहेफुज (पाताळातील विशेष स्थान) मधून आकाशात व अल्लाहच्या हुकुमानुसार हजरत जिब्रईल अलैसलाम यांना जसे आदेश झाले जेव्हा झाले तेव्हा त्यांनी हा मुकद्दस (पवित्र) कलाम कोणत्याही परिवर्तनाशिवाय प्रेषित पैगंबरांपर्यंत पोहोचविला.
कधी दोन आयते कधी तीन, कधी एका आयत (श्‍लोक) पेक्षाही कमी,कधी दहा-दहा आयते तर कधी संपूर्ण सुरते (अध्याय) यालाच शरीयतमध्ये ‘वही’ म्हणतात. वही येण्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले गेले आहे. त्यात प्रमुख म्हणजे फरिश्ते (देवदूत) वही घेऊन येत तेव्हा एक घंटीच्या आवाजासारखा आवाज होत असे हा प्रकार इतर सर्व प्रकारांपेक्षा कठीण होता. या काळात प्रेषित पैगंबरांना खूपच त्रास होत असे. प्रेषितांनी फर्माविले की, ज्यावेळी वही येत असे तेव्हा मला वाटे आत आपले प्राण निघून जातील. दुसरा प्रकार म्हणजे फरिश्ते प्रेषितांच्या मनात काही गोष्टी टाकून देत. तिसरा प्रकार म्हणजे फरिश्ता मानवी रुपात प्रकट होऊन बातचिंत करीत असे. हा प्रकार सोपा होता व यात त्रासही होत नव्हता. चौथा प्रकार स्वत: अल्लाह च प्रेषितांशी संभाषण (हमकलाम) होत असे. जसा शबेमेअराजमध्ये झाला होता. पाचवा प्रकार म्हणजे अल्लाहतआला स्वप्नात येऊन द्दष्टांत देत असे. असे अनेक प्रकारे कुरआनपाकचे अवतरण झाले. मात्र पाचवा प्रकार कुरआनच्या बाबतीत घडलेला नाही. यावर अनेकांमध्ये मतभेद आहेत. तरी पहिले चार प्रकारांबाबत सर्वात एकमत आहे. 
कुरआनशरीफच्या वेळोवेळी नाजील होण्यामागे काही वैशिष्ट्ये होती, यातील काही आदेश काही काळानंतर अल्लाहने रद्द केले. ज्यावेळी प्रेषित पैगंबरांनी या जगाचा निरोप घेतला त्यावेळी कुरआनशरीफ आजच्यासारखा एकत्रित नव्हाता. अनेक वस्तुंवर कुरआन शरीफची आयते व सुरते लिहिलेले होती व तो वेगवेगळ्या लोकांजवळ जमा होता. बहुतांश प्रेषितांच्या अनुयायांना पूर्ण कुरआनशरीफ तोंडपाठ (हिफ्ज) होतो.
सर्व प्रथम कुरआनपाकचे एकत्रिकरण करण्याचा विचार दुसरे खलीफा हजरत अमीरुल मोमेनीन उमरफारुक (रजि) यांच्या मनात आल. अल्लाहने कुरआननाजीली करतांना फर्मविले होते की, कुरआनचे आम्ही हाफिज आहोत की, कुरआनचे आम्ही हाफिज आहोत. त्याला जमा करणे व त्याचे संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे. तो काळ हजरत अबुबकर सिद्दीक (रजि) यांच्या खिलाफतीचा होता. 
हजरत उमरफारुक त्यांच्या सेवेत हजर झाले व त्यांनी सांगितले की, हुफ्फोच कुरआन (ज्यांना कुरआन तोंडपाठ आहे असे लोक) शहीद होत आहेत आणि बरेचसे जंगेयमामामध्ये शहीद झाले आहेत. मला भीती अशी वाटते की, असे घडत राहिल्यास कुरअनशरीफ आमच्या हातून निघून जाईल. तेव्हा मला असे वाटते की, आपण याकडे लक्ष घालावे व कुरआनमजीद एकत्र जमा करण्यासाठी उपाय योजावेत हजरत सिद्दीक (रजि.) यांनी सांगितले की, जे कार्य प्रेषित पैगंबरांनी केले नाही ते आपण कसे काय करु शकतो? हजरत उमरफारुक यांनी म्हटले की, खुदा की कसम हे चांगले कार्य आहे व वेळोवेळी त्यांनी त्याबाबत पाठपुरावाचालू ठेवला. शेवटी ही चळवळ (तहेरीक) यशस्वी झाली व हजरत सिद्दीक (रजि.) यांच्याही मनाची तयारी होऊन त्यांनी जैदबिन साबीत (रजि.)यांना बोलावून कुराआनचे एकत्रिकरण करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली. 
त्यांनी मोठ्या श्रध्देने ही जबाबदारी पार पाडली. यासाठी त्यांचीच नियुक्ती का केली गेली तर दरवर्षी रमजानमध्ये हजरत जिब्रईल अलैसलाम हे प्रेषित पैगंबरांना कुरआन पठण करुन ऐकवित असत. शेवटच्या वर्षी दोन वेळा कुरआनचे पठण झाले व जैनबिन साबीत (रजि.) हे शेवटच्या दौरामध्ये सामील होते. त्यांना निवड केली गेली. 
यानंतर हजरत उमफारुक (रजि.) यांच्याकाळात लिहितांना ज्या उणिवा राहिल्या होत्या त्या दुरुस्त करण्यात आल्या. त्यांनतर कुरआन शरीफ तोंडपाठ असलेले हाफिज जगभर पाठवून जगाला कुरआनची शिकवण(तालीम) देत राहिले. अशा प्रकारे कुरआनशरीफ आपल्यापर्यंत पोहचले आहे.