Breaking News

एका नक्षलवाद्याचा खात्मा; मोठ्या कटाची तयारी

विजापूर - भैरमगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांत जबरदस्त चकमक उडाली. यात पोलिसांनी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातले. यानंतर घटना स्थळावरून पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि एका बंदुकीसह टिफिन बॉम्बदेखील हस्तगत करण्यात आला आहे. चकमकीनंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. आणखी एका घटनेत सुरक्षाबलाने कोंडागाव जंगलात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्र आणि स्फोटकांसह साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी म्हटले आहे, की एकाच ठिकाणी लपवून ठेवलेले हे साहित्य एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकतो. गेल्या पाच महिन्यात सुकमा आणि विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाने 50 हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.