बारावीच्या परीक्षेत मुलीच ठरल्या बाजीगर
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहिर झाला. यामध्ये श्रीगोंदा तालुक्याच्या पश्चिमेच्या टोकाला असणार्या देवदैठण, ढवळगाव, उक्कडगाव येथील विद्यालयातील मुलींनी बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करताना पहिले तीनही क्रमांक पटकावत बाजीगर ठरल्या.
देवदैठण (ता. श्रीगोंदा ) येथील संस्कार ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. यामध्ये मोनिका बनकर हिने 413 ( 63.53टक्के ) गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. शितल ढवळे हिने 411 ( 63.23 टक्के ) गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला तर 393 ( 60.46 टक्के ) गुण मिळवत राणी रिकामे या विदयार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविल्याची माहिती संस्थापक संजय कौठाळे यांनी दिली. तसेच येथील विद्याधाम कला कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 91 .11 टक्के लागला आहे. कांचन भवर हिने 529 ( 81 .38 टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक मिळविताना अश्विनी कौठाळे हिने 486 ( 74.76 टक्के ) गुण प्राप्त केले तर तृतीय क्रमांक मिळविताना जया उघडे हिने 483 ( 74.30 टक्के ) गुण मिळविल्याची माहिती प्राचार्य संभाजी शेळके यांनी दिली. ढवळगाव ( ता. श्रीगोंदा ) येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 85.76 टक्के लागला. मोनिका तुपे हिने 513 ( 79 टक्के) गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. पूजा दिवटे हिने 507 ( 78 टक्के ) गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला तर 490 ( 76 टक्के) गुण मिळवत अलका चव्हाण या विदयार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविल्याची माहिती मुख्याध्यापक मधुकर सुपेकर यांनी दिली. तसेच उक्कडगाव ( ता. श्रीगोंदा ) येथील मुंजाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 83.33 टक्के निकाल लागला. यामध्ये नयन कातोरे हिने 466 ( 63.53 टक्के) गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तेजश्री बाराथे हिने 463 ( 63.23 टक्के) गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला, तर 431 ( 60.46 टक्के) गुण मिळवत रोहिणी रमेश माने या विदयार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविल्याची माहिती मुख्याध्यापक भगवान शिर्के यांनी दिली.
यशवंत विद्यार्थ्यांचे जि.प. सदस्या कोमल वाखारे, पं.स. सदस्या कल्याणी लोखंडे व गितांजली पाडळे यांनी अभिनंदन केले.