सेवापुर्तीनिमित्त शासकीय कार्यालये, शाळांमध्ये सत्कार
जन्मदिनांक माहित नसलेल्या व्यक्तींची एक जून ही तारिख शासकीय दप्तरी नोंदविली जाते. या तारखेचे कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त होतात. त्यामुळे गुरुवारी विविध शाळा, महाविद्यालये, शासकिय कार्यालयातुन कित्येक सेवकांचा सेवेचा अखेरचा दिवस होता. शाळांना सुट्ट्या असल्याने शिक्षण क्षेत्रातील कर्मचार्यांचे सेवापुर्ती समारंभ 15 जूननंतर होणार आहेत.
खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील प्राचार्य चंद्रकांत मोरे, शिक्षक हासन सय्यद, परिचर शिवाजी जाधव यांची सेवापुर्ती झाली. 19 जून रोजी सेवापुर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी तसेच संस्था पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत. कुळधरणचे पोस्टमास्टर अनिल कुलकर्णी यांनीही डाक विभागातील सेवा पूर्ण केली.कर्जत पंचायत समितीतील विस्ताराधिकारी निर्मला अर्जुन गुंड यांचा सेवापुर्ती समारंभ हभप. सतीश महाराज साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कर्जतला होत आहे.
मिरजगावच्या नूतन माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. बबनराव खराडे व प्रा. विलासराव भापकर यांची सेवा पुर्ण झाली. कर्जतच्या अमरनाथ विद्यालयातील विलास बाबुराव भैलुमे यांचीही सेवापुर्ती झाली. उपमुख्याध्यापक प्रताप भैलुमे तसेच आदी शिक्षकांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.