Breaking News

आयुष्याची दिशा ठरवताना शिबिरास आजपासून प्रारंभ

टाकळी ढोकेश्‍वर / न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर महावियालयाचा मराठी विभाग आणि साधना साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्याची दिशा ठरवताना या विषयावरील शिबीरास आजपासून पुण्यात उत्साहात प्रारंभ झाला.


आज सुरुवातीला विद्यार्थ्यांशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. मनोहर जाधव यांनी साहित्य आणि समाज या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपला समाज विषयक आणि जीवन विषयक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सतत वाचत राहायला हवे. समाजाचे बारकाईने निरीक्षण करावे, विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, चांगल्या साहित्यकृती पुन्हा पुन्हा वाचाव्यात, स्वतःचा स्वतंत्र दृष्टिकोन विकसित होण्यासाठी स्वतःची मत मांडायला प्रारंभ करा.
आज दिवसभरात राजेंद्र बहाळकर, सुभाष वारे, संजय भास्कर जोशी, किशोर रक्ताटे हे मान्यवर विदयार्थ्यांशी संवाद साधला. या शिबिरासाठी महावियालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या शिबिराचे नियोजन साधनाचे विनोद शिरसाठ, डॉ. हरेश शेळके, प्रा. सुजाता गागरे, प्रा. रूपाली कदम, डॉ. वैशाली भालसिंग यांनी केले.