Breaking News

विकास कामांसाठी जि. परिषदेच्या माध्यमातून भरीव निधी देणार

पारनेर तालुक्यातील कुरुंद व मावळेवाडी येथे जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्या निधीतून 16 लाख 60 हजार किंमतीच्या को.प. बंधार्‍याचे लोकार्पण सोहळा लोकनेते निलेश लंके यांचेहस्ते काल संपन्न झाला. 
कुरुंद व मावळेवाडीच्या शिवारात असलेल्या या बंधार्‍यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना याचा चांगला फायदा होणार आहे. यामुळे जिरायत जमीन बागायत होणार असून शेतकर्‍यांना भर उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार असून, शेतकर्‍यांनी ठिबक सिंचनचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढवावी. जलसंधारणाच्या माध्यमातुन तसेच इतरही अनेक विकास कामासाठी भविष्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव निधी देणार असल्याचे राणी लंके यांनी यावेळी सांगीतले. 


यावेळी मा. सभापती सुदाम पवार, कुरुंदचे उपसरपंच निलेश खेमनर, सदस्य किसन नरवडे, मा. सरपंच दशरथ कुलाळ, मावळेवाडीचे मा. सरपंच कुरकुटे, नानापठारे, संजु कोळेकर, निलेश शेंडगे, नामदेव घुले, बाजीराव चहाळ, सुरेश पठारे, हनुमंत शिंदे, पाडुरंग पावशे, भाऊ खेमनर, कांतीलाल भोसले, संतोष कर्डिले, रघुनाथ भोसले, रावसाहेब गायकवाड, संतोष भापकर, निलेश लंके प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व निलेश लंके समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते.