Breaking News

राहुरीत एकाच रात्री विद्युत मोटारिंची चोरी 4 ते 5 लाख रूपयांना फटका

राहुरी / प्रतिनिधी ।  येथील शहर वस्तीतून शेतकर्‍यांच्या मालकीच्या विहिरीतील 10 विद्यूत मोटारी 4 ते 5 लाख रुपये किंमतीच्या एकाच रात्री चोरुन नेल्याची घटना घडली असून, या घटनेने शेतकरी धास्तावून गेले आहेत, तर चोरांचा तपास लावण्यासाठी शेतकर्‍यांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांचेसमोर कैफियत मांडून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी शहरात दरोड्यांसह भूरट्या चोरांचे प्रमाण वाढले असून, नागरीक दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. या भूरट्या चोरांनी शहरात धूमाकूळ घातला असून, दिनांक 30 मे रोजी मध्यरात्री जुने बस स्थानक ते डिग्रस केटी दरम्यान मुळा नदीकाठी असलेल्या भाऊसाहेब येवले, जुबेर आतार, संतोष येवले, आबासाहेब येवले, पुष्पाताई येवले, यादव तोडमल, गणेश देवरे या शेतकर्‍यांच्या 4 ते 5 लाख रुपये किंमतीच्या विहिरीतील दहा मोटारी व केबल एकाच रात्रीत चोरट्यांनी पळवून नेले. एका मोटरीची किंमत सुमारे 35 ते 40 हजार रुपये आहे. या घटनेमुळे शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत भाऊसाहेब येवले यांच्यासह सर्व शेतकर्‍यांनी तहसीलदार अनिल दौडे व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांची भेट घेऊन शहरात होणार्‍या चोर्‍यांना आळा घालण्याची मागणी केली.
भाऊसाहेब येवले यांनी पोलिसांत रितसर फिर्याद दाखल केली असून, या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.