Breaking News

‘साई आदर्श मल्टीस्टेट’चे आज उदघाटन


राहुरी ता. प्रतिनिधी : पैशांपेक्षा विश्वास मोठा आणि विश्वासापेक्षा श्रद्धा मोठी, या भावनेतून श्रद्धापूर्वक अर्थसेवा आम्ही करीत आहोत. सेवा, सुरक्षा आणि विश्वास या त्रिसूत्रीतून विकास असा आमचा प्रवास आहे, असे प्रतिपादन ‘साई आदर्श मल्टीस्टेट’ संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले.

तालुक्यातील साई आदर्श मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या १८ व्या शाखेचे उदघाटन राहुरी तालुक्यातील उंबरे येथे होत आहे. उद्या {दि. १५ } सकाळी दहा वाजता होत असलेल्या उदघाटन सोहळ्याविषयी माहिती देतांना ते बोलत होते. यावेळी नेवासा येथील जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे ह. भ. प. उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी मल्टीस्टेट फेडरेशनचे चेअरमन सुरेश वाबळे असतील. 

याप्रसंगी दत्तात्रय आड्सुरे, कडूभाऊ काळे, नामदेवराव ढोकणे, शामराव निमसे, बजरंग तनपुरे, विजया ढोकणे, साहेबराव दुशिंग, विजय ढोकणे, विलास ढोकणे, सुनील आड्सुरे, नवनाथ ढोकणे, शहाराम आड्सुरे, संतोष ढोकणे, अण्णासाहेब तारडे, ज्ञानदेव क्षीरसागर आदी उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक, कर्मचारी आणि पिग्मी एजंट यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक मंडळाच्यावती करण्यात आले आहे.