Breaking News

फलटण शहरातील नाना पाटील चौकात दुधाचा टँकर ओतून निषेध

सातारा, दि. 07, जून - देशभरात विविध शेतकरी संघटनांनी संपाची हाक दिली आहे. संपाच्या सहाव्या दिवशी फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात शेतकरी संघटना किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी आज बुधवारी दुधाचा टँकर ओतून निषेध व्यक्त करण्यात आला. गाईच्या दुधाला 35 आणि म्हैशीच्या दुधाला 60 रुपये दर द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. फक्त तुमच्या घोषणा होतात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना अधिकच अडचण निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी तुमच्याकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र तुम्ही पोकळ आश्‍वासने देताय आणि खाली त्याची चोख अंमलबजावणी होताना दिसत नाही. या मुळे या पुढे आता शेतकरी हातात दांडके घेऊन आंदोलन करणार असलेचे गोडसे यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकरी संघटनेचे (किसान मंच) चे फलटण तालुका अध्यक्ष लल्लन काझी,कोरेगाव तालुका अध्यक्ष जयवंतराव निकम व शेतकरी उपस्थित होते.