चांडेवाडी-नांदूर रस्त्याची ‘आपले सरकार’वर तक्रार! स्थानिक नागरिक करणार आंदोलन
श्रीरामपूर ता. प्रतिनिधी
तालुक्यातील महत्त्वाचा नांदूर ते चांडेवाडी हा ५ किमी रस्ता पहिल्याच पावसात अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने चारचाकी वाहतूक बंद आहे. तब्बल १५ वर्षे हा रस्ता दुरूस्त झाला नाही. एवढ्या प्रदीर्घ कालावधीत या रस्त्याला निधीच मिळाला नाही का, असा सवाल स्थानिक तरूणांनी उपस्थित केला आहे. या रस्त्याविषयी या तरुणांनी ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
या खराब रस्त्याने स्थानिक शेतकरी आणि दूध व्यावसायिक त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी वर्षानुवर्षे ये-जा करीत आहेत. हा रस्ता दुरुस्त व्हावा, यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. पंरतु हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी या भागाच्या नेतृत्वाला योग्य आला नाही. मध्यंतरी डॉ. सुजय विखे यांनी प्रवरा परिसर व नांदूर गावातील रस्त्यावर मुरूम टाकला होता. पंरतु त्यानंतर नांदूर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी याकडे जाणुनबुजुन दूर्लक्ष केले. या मंडळींनी गावातील सर्व रस्त्यावर मुरूम टाकला. पंरतु हा रस्ता सोडला, असा आरोप केले जात आहे. हा रस्ता येत्या आठ दिवसात दुरूस्त न केल्यास चांडेवाडी, तांबेवाडी, फत्याबाद आणि नांदूरचे ग्रामस्थ श्रीरामपूर-संगमनेर या रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करणार आहेत.
यासंदर्भात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सोडणार, डॉ. सुजय विखे युवा मंचचे अध्यक्ष अमोल थोरात, ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष दत्तात्रय हाळनोर, दगडू पावले, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चांडे, पांडुरंग आठरे, रंगनाथ बाहुले, सुभाष खेमनर, मधुकर चांडे, विजय चांडे, सुनिल सोडणार, किशोर पारखे, समीर हिवरकर, दत्तात्रय बाहुले, सुभाष थोरात आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे