Breaking News

श्रीक्षेत्र चासनळी ते पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन


कोपरगाव शहर प्रतिनिधी 

सालाबादप्रमाणे याही वर्षी तालुक्यायातील श्रीक्षेत्र चासनळी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे दि. ५ ते २४ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती दिंडी संचालक हभप बाबूराव महाराज चांदगुडे यांनी दिली. ते म्हणाले, चास येथून दि. ५ जुलै रोजी दुपारी २ वाजता ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. २३ जुलै रोजी दिंडी उजनी इरिगेशन काॅलनी, पंढरपूर येथे मुक्कामी उतरणार आहे. दि. २४ जुलै रोजी पारणे फेडून दिंडी पुन्हा कोपरगांवकडे परतीच्या प्रवासास येईल. जास्तीत जास्त भाविकांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन हभप बाबुराव महाराज चांदगुडे यांनी केले आहे.