Breaking News

जॉब फेअरच्या प्रवरा पॅटर्नला प्रतिसाद!


लोणी प्रतिनिधी 

विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आभियांत्रिकी महाविद्यालय, रूदा स्कील अॅण्ड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवरा प्लेसमेंट २०१८ मध्ये २ हजार ५०० विद्यार्थी, विद्यार्थीनींना नामवंत कंपन्या आणि बॅकीग क्षेत्रातील नोकरीकरिता थेट मुलाखती देता आल्या. या जॉब फेअरला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 

एकाच ठिकाणी तांत्रिक शाखेबरोबरच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी विद्यार्थीनींना मुलाखती देण्‍याच्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍याने या जॉब फेअरच्‍या प्रवरा पॅटर्नचा मोठा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना होत आहे. राज्यातील विविध नामवंत कंपन्या,बॅकीग क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. पण ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थीनीना या नोकर्‍याबाबत माहीती उपलब्ध होत नाही. त्यामुळे शहरात जाण्याच्या संधी जातात, ही समस्या ओळखून विरोधी पक्षनेते विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने जॉब फेअरचे नियोजन सातत्याने केले जात आहे.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सेक्रेटरी भारत घोगरे, शिक्षण संचालक हरिभाऊ आहेर, प्राचार्य मनोज परजणे,प्राचार्य यशवंत खर्डे, उपप्राचार्य विजयकुमार राठी, आयटीआयचे प्राचार्य जयंत धर्माधिकारी, स्कील डेव्हलपमेंट अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. धनंजय आहेर, डॉ.राजेंद्र निंबाळकर, डॉ. भागसेन पर्वत आदींच्या उपस्थितीत या जॉब फेअरचे उदघाटन करण्यात आले. ऑनलाईन पध्दतीने १ हजार ७०० उमेदवारांनी यामध्ये प्रवेशासाठी नोंदणी केली होती. आयत्यावेळी आलेल्या उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन या सर्वांनाच या जॉब फेअरमध्ये सहभागी करून घेण्यात आले.