Breaking News

शिक्षणात राजकारण करू नये - सुप्रिया सुळे


शिक्षक आणि प्राध्यापक भरतीसाठी राज्यभर आंदोलने होत आहेत. परंतु, सरकारने अद्याप त्याची गांभिर्याने दखल घेतली नाही. सरकारने शिक्षणात राजकारण करू नये. प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविण्याबाबत सरकारने त्वरीत योग्य ती पाऊले उचलावीत. तसेच त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले. पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या शिक्षण संचालक कार्यालयापुढे सोमवारपासून सेट, नेट, पीएचडी पात्रताधारकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. खासदार सुळे यांनी आज सकाळी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलक ांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच याप्रकरणात आपण लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्‍वासन दिले. पुण्यातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरातही पात्रताधारक धरणे आंदोलनाला बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.