Breaking News

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीत आंदोलन


पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीविरोधात चुलीवर भाकरी करुन आज आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगरसेविका विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चुली मांडून भाकरी करुन गॅस दरवाढीचा निषेध केला. ’गॅस दरवाढ करणा-या केंद्र, राज्य सरकारचा निषेध’, ’भाजपचे हेच का अच्छे दिन’, अशा घोषणा यावेळी आंदोलक महिलांनी दिल्या.