Breaking News

बहुप्रतीक्षित 'दुबई मास्टर कबड्डीचे ' कर्णधारपद अजय ठाकूरकडे


मुंबई प्रतिनिधी

दुबईत २२ ते ३० जून दरम्यान रंगणाऱ्या, दुबई मास्टर कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी अजय ठाकूरला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून घोषितकरण्यात आले. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, कोरिया या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. कबड्डी विश्वचषकानंतर एकाही महत्वाच्यास्पर्धेत अनुप कुमारची संघात निवड झालेली नाहीये. त्यामुळे अनुप कुमारच्या अनुपस्थितीत संघातील सर्वात अनुभवी खेळाडू या नात्याने अजय ठाकूरकडे भारतीय संघाचं नेतृत्वसोपवण्यात आलेलं आहे.

असा असेल भारताचा राष्ट्रीय कबड्डी संघ –

अजय ठाकूर (कर्णधार), गिरीश एर्नाक, सुरिंदर नाडा, मोहित छिल्लर, राजु लाल चौधरी, सुरजित नरवाल, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रिशांक देवाडीगा, मोनू गोयत, रोहित कुमार, मनजीत छिल्लर, संदीप नरवाल, दिपक निवास हुडा

राखीव खेळाडू – मणिंदर सिंह, सचिन तवंर